राज्यातील आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. या यादीत पणजी येथून राजेश रेडकर तर मुरमुगोवा येथून परेश तोरसेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मनोज परब यांनी यादी पणजी येथे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. यावेळी सोबत मांद्रे मतदार संघाच्या उमेदवार सुनयना गावडे व मयूर आरसेकर उपस्थित होते.

यावेळी महिला सक्षमीकरण व कल्याणासाठीच्या योजनेची घोषणा करण्यात आली. दोन हजार प्रति महिना किंवा तीन लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज दिला जाईल जो पुन्हा घेणार नाही. दहा लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज, सरकारी समर्थांनी व्यवसायासाठी. लाडली लक्ष्मी लग्नावेळी 100000 आणि जर शिक्षणासाठी घ्यायची असेल तर 2 लाख 50 हजार पर्यंत. स्वसंरक्षण प्रशिक्षणासह महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही, महिला सुरक्षा मोबाइल अॅप, 24×7 केंद्रीकृत महिला हेल्प लाइन क्रमांक, विशेष महिला पोलीस तुकडी मजबूत केले जाईल.

आरोग्य सेवा, घरगुती हिंसाचार, विशेष वाहतूक, महिला उद्योजकता प्रशिक्षण केंद्र, छोटे व्यवसाय केंद्र, गावात उपलब्ध असलेल्या बचत गटांना पाहिजे ते समर्थन देणार. जेणेकरून महिला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनतील. व स्वतःच्या कष्टाने मर्यादे हून अधिक कमवायला त्यांना संधी मिळेल परब यांनी पुढे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here