रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वस्व मनोज परब हे थिवी आणि वाळपई मतदार संघातून निवडणूक लढवणार असून ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे जाहीर होताच परब यांनी आपल्या मतदान असलेल्या मतदारसंघात म्हणजेच थिवी मतदार संघात आपला प्रचार सुरू केला आहे.

या मतदार संघात आरजी या अगोदर प्रत्येकाच्या दारावर पोचली आहे आणि आरजीच्या पोगो बिलाबद्दलची माहिती प्रत्येक मतदाराला आहे. आता परब स्वतःहून निवडणूक त्याच मतदार संघातून लढवणार असे मतदारांना समजत त्यांचं उत्साह आणखी वाढू लागला आहे. प्रत्येक घरात त्यांचे आदराने स्वागत केले जाते. या मतदार संघात आरजीचा विजय नक्कीच होईल यात शंका नाही. सर्व मतदार आरजीला राहिले होते. आणि 14 फेब्रुवारीला आरजी बद्दलचे त्यांच्या मनात असलेले प्रेम ते नक्कीच दाखवून देतील असे परब म्हणाले.

या मतदार संघात कितेक भोगस मतदार यादीत रुजू झाले आहेत. युवक बेरोजगार आहेत, जवळच असलेल्या औद्योगिक वसाहत युवकांना नोकरी मिळत नाही. पाणीटंचाई, खराब रस्ते, आमदारांची राज्य शाही या सर्वांना मतदार कंटाळले आहेत.या मतदार संघातील भंगार हंडे जास्त प्रमाणात प्रदूषण करत आहेत. या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष आरजीचे सरकार स्थापन होताच कमीत कमी वेळात लागेल अशी हामी परब यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here