रिव्होल्युशनरी गोवन्स प्रमुख मनोज परब हे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या विरुद्ध वाळपई मतदारसंघातुन आणि स्वतः मतदान असणाऱ्या थिवी मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

या निर्णयाची घोषणा करताना रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्षांनी सांगितले की, मनोज परब हे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांना दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत, ज्यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स किंवा कोणीही त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते.

आता आरजी नेजाहीर कले की, विश्वजित राणे या व्यक्तीने दिलेले आव्हान त्यांनी स्वीकारले आहे, ज्याला स्वत:चा अंत नाही असे वाटते आणि ज्यांना राज्यभर सर्वत्र नापसंती आहे आणि जो कोविड संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्यामुळे गोव्यातील असंख्य मृत्यूंना जबाबदार आहे. आणि आरजीने त्यांना आवाहन केले की त्यांनी वाळपई मतदार संघातून पळून परये मतदारसंघात न जाता हिम्मत असेल तर आपल्या विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरावे.

सुरक्षित म्हणून दोन मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असे नाही तर प्रत्येक मतदारसंघात मनोज परब यांनी निवडणूक लढवावी अशा कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे आपण हा पर्याय निवडल्याचे परब यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवावी असे आपल्याला वाटत होते पण थिवीत आपण लहानाचा मोठा झालो आणि अनेक लहानपणाच्या मित्रांनी हट्ट केल्यामुळे हा मतदार संघ आपण निवडला आणि वाळपईत घराणेशाही संपवण्याचा हेतूने. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून परब यांची निवड केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मार्गात आव्हाने असतील आणि इतर पक्षही आमचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरतील पण आम्ही डगमगणार नाही आणि दोन्ही मतदारसंघात दोन ते तीन हजार मतांनी विजयी होईल, असे परब म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here