गोवा सुरज पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवणार असे आरजीने जाहीर करताच पक्षांचे अध्यक्ष इनासिओ वास यांच्या मते काँग्रेससोबत उमेदवार वाटून घ्यावे, गोयचो आवाजच्या कॅप्टन यांना उमेदवारी द्यावी, गोवा सुरज पक्षाला पाच मतदार संघात जागा सोडाव्यात, नावेली मधील उमेदवार बदलावा, आरजीचे पोगो बिल उमेदवारांनी जनतेपर्यंत पोहचू नये असे कित्येक मानसिक होणार्या छाळामुळे आरजीने गोवा सु-राज पक्षाला कायमचा रामराम दिला आहे.
पणजी येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब पुराव्यांसह बोलत होते व इतर पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. गोवा सुराज पक्ष पूर्णपणे आरजीला देतो असे त्यांनी अगोदर सांगितले होते. ते आरजी सोबत निष्ठावंत नसल्याने पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्याचे त्यांच्यापासून लपून ठेवले होते. त्यांचा स्वार्थ आता साध्य करता येणार नाही म्हणून त्यांनी आरजी वर टीका करायला सुरुवात केली. यापुढे आरजीवर होणाऱ्या आरोपांना प्रतिउत्तर त्याच वेळी आरजी समाज माध्यमातून देईल परब म्हणाले.
सुरज नाईक हा पक्षाचा सरचिटणीस नाही. त्यांला या अगोदर बाहेर काढले होते. निष्ठावंत नसल्याने त्याला पक्षात जागा मिळाली नाही. आता आरजीचे सर्व विरोधक एकत्र येऊन आरजीच्या विरोधात काम करण्यासाठी त्याचा वापर करून घेत आहे. जर आरजी वाईट असे त्यांना वाटत होते तर दोन वर्ष तोंड कोणी शिवले होते असा प्रश्न विश्वास नाईक यांनी उपस्थित केला. आरजीच्या समर्थकांवर कोणताही आरोप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आरजी गोव्यासाठी काम करत आहे आणि यापुढे करत राहील असे विश्वेश नाईक पुढे म्हणाले.