तिसवाडी तालुक्यातील कुर्का ही सर्वात श्रीमंत पंचायत असूनही अकार्यक्षमता, भ्रष्टाचार आणि गावाला सर्वच बाबतीत मागास ठेवल्याबद्दल रिव्होल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी सेंट आंद्रेचे काँग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यावर जोरदार टीका केली.
केवळ कर्कातच नाही तर पूर्ण गोव्यात बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. सर्वसामान्यांसाठी योग्य सार्वजनिक स्वच्छतागृहे, ड्रेनेज व्यवस्था, रस्ते, पाणी आणि वीज उपलब्ध केली जात नाही. विद्यमान आमदाराच्या कार्यकाळात बेकायदा झोपडपट्ट्या फोफावल्या आहेत. गावात अनेक मोठी बांधकामे बांधली जात आहेत किंवा नियोजित आहेत. युवकांना सराव करण्यासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी योग्य मैदान नाही असे विरेशने कुर्का येथे बैठकीला मार्गदर्शन करताना म्हटले.
रिव्होल्युशनरी गोवन्स प्रमुख मनोज परब यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या राजवटीत राज्यात रोजगाराची संधी कशी कमी झाली आहे याकडे लक्ष वेधले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपला सत्तेवर आणल्यानंतर महागाईचा दर दुहेरी अंकात गेला. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कातर लागली आहे. आपण निवडून दिलेल्या या 40 लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी काहीही केले नाही. गोव्याला उद्ध्वस्त करून त्यांनी फक्त त्यांची मालमत्ता वाढवली आहे असे मनोज परब यांनी म्हटले.