गोव्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा समोर येत असतानाच, काही दिवसापूर्वी मडकई मतदारसंघातील मडकई ते करंजाळे ह्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्यावरून मडकई इंडस्ट्रीज मध्ये महिला, पुरुष कर्मचारी, तसेच तिथे असणाऱ्या शाळा कॉलेज मध्ये शाळकरी मुले ये जा करीत असतात.मात्र रस्त्याच्या दुर्वस्थेमुळे अपघाताचा धोका वाडला आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्‍यक आहे. परंतु, नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मडकई करांजाळे तसेच मडकई औद्योगिक वसाहती तील रस्त्याची स्थिती फारच दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या जर्जर अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असल्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारावी अशी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे.
या मडकई मतदारसंघाचे आमदार ढवळीकर यांनी स्वतः गेली वीस वर्षे बांधकाम खाते उपभोगले आहे. तरीही ते आपल्या मतदार संघातील रस्ते ठीक करू शकले नाही.जो स्वतः च्या मतदार संघाचा विकास करू शकत नाही तो गोव्याचा विकास कसा करेल असे मत मडकई तील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
मडकई तील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.त्यामुळे कंपनी मध्ये जाणाऱ्या नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागच्या वेळी ह्या रस्त्यांची तात्पुरती सारवासारव केली होती. पण पहिल्याच पावसात ते वाहून गेले आणि परत खड्डे दिसायला लागले. सध्याचे बांधकाम मंत्री पाऊसकर यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे, परिणामी एखादा मोठा अपघात घडल्यावर विभागाला जाग येणार का? असा प्रश्न तेथील नागरीकांना पडतो. असं वाटतं राजकारणी बंधूंनी इतकी वर्षे जनतेला लाचारीमध्येक ठेवले पसंत केले आहे. गोव्याचा विकास सोडाच पण स्वतः. च्या मतदार संघाचा विकास त्यांना करता आला नाही.लोकांना चांगले रस्ते देता आले नाही.
रस्ते बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे हलक्या प्रतीचे असते व रस्ता विकसित करण्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे करण्यात येते, हे रस्ते बघितल्यावर लक्षात येते. अनेक वर्षापासून राजकारणी लोक अशा विकासाच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांची काळी कमाई करीत असतात आणि ह्या कमाईचा उपयोग ते जनतेला लाचारित ठेवायला करतात. त्यांना आपल्या पायाशी यायला भाग पाडतात. पण आता जनतेला हे काळया पैशाचं गुपित माहीत झालं आहे. आणि यापुढे ते फसणार नाही, आता फक्त एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे “रेवोलूशनरी गोवन. ” आणि हाच पक्ष यापुढे गोव्याची संस्कृती आणि निज गोवेकरांचे अस्तित्व सांभाळू शकेल यात शंका नाही असे मडकईतील ग्रामस्थ सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here