एक दिवस शेतात हा उपक्रम काल माडापई मार्शेल येथे राबवण्यात आला होता. या वेळी विश्र्वेष नाईक, दिनेश केरकर, सूरज फडते, मिलिंद फडते, सिद्धेश गावडे दामू नाईक, विनय गावडे, गौरेश गावडे व लहान मुले तशेच इतर ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हा उपक्रप तीन वर्षापूर्वी रेविल्युशनरी गोवन्स ने सुरू केला होता. या उपक्रमाचा मुख्य हेतु होता, गोव्यातील युवा पिढीला शेतीची आवड निर्माण करणे, त्यांना आपल्या मातीशी असलेलं नातं समजावं, त्यांनाही शेतीचे महत्त्व कळाव, तसंच गोव्यातील शेती मध्ये नवी नवी तंत्रज्ञान वापरून पडीक असलेली शेत जमीन पुन्हा कृषी लागवडी मध्ये आणावी, कारण आजच्या आधुनिक जगात आपण आपल्या मुलांना ह्या मातीपासून दूर ठेवलं आहे. त्याला पुन्हा ह्या मातीशी जुळवण फार गरजेचं आहे.

आम्हाला पूर्ण खात्री आहे की यापुढे जो सरकार येईल तो रेवोलूशनरी गोवन चाच येईल. गोव्यातील लोक आणि दैवी शक्ती आमच्याबरोबर आहे. लोकांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने उद्या जेव्हा आमचा सरकार येईल तेव्हा आम्ही युवा पिढीला शेतीमध्ये यायला प्रोत्साहन देणार. आम्ही गोवेकराना वचन देतो की आम्ही आपले शेतकरी हा एक ब्रँड बनून जगासमोर आणणार, त्याला त्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देणार जेणेकरून तो शेती करताना लाजणार नाही, आणि आपली जमीन तो दलालांच्या घशात घालण्याचा विचार देखील करणार नाही आणि त्याला इतकं शेतीमध्ये पाठबळ देऊ की तो स्वतः अभिमानाने सांगू शकेल की होय मी एक शेतकरी आहे आणि मला त्याचा अभिमान अाहे. आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी अश्या योजना आखणार की गोवा कुठल्याही परिस्थिती दुसऱ्या राज्यावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनेल असे रेवोलुशनरी गोवन चे सहसंस्थापक विष्वेश नाईक म्हणाले.


सध्या गोव्यातील राजकारणी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यात असफल झाले आहे , त्यांना आधार देत नाही याउलट गोव्यातील शेतकरी कंटाळून ती शेती सोडावी आणि ती शेतजमीन आपण गिळंकृत कशी करता येईल याचे षड्यंत्र सुरू असल्याचे त्यांनी बोलताना म्हटले. सरकार एकीकडे शेंद्रिय शेतीचे गुणगान गाते तर दुसरीकडे ते शेतकरयाला उरियाचे वाटप करते. पण रेवोलूशनरी गोवन्स चा उद्देश हा फक्त विषमुक्त शेतीचा आहे असेही ते म्हणाले.


रेवोलूशनरी गोवन्स चे दिनेश गावडे यांनी खाजन शेतीचा विषय काडला व म्हणाले की गोव्यातील खाजन शेती ही मुद्दामहून बंधारे फोडून अथवा फुटलेले बंधारे दुरुस्त करत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होते, व नाईलाजाने तो ती शेती सोडून देतो. दुसरीकडे सरकार ज्याला मालाला अधिक मागणी आहे त्याची माहिती अथवा बियाणे पुरवत नाही त्यांना शेतीतील यंत्र उपलब्ध करून देत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.
… Gauresh Tulshidas Gaude

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here