पणजी: गोवा किनारी विभाग व्यवस्थापन. आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी पणजी व मडगाव येथे जनसुनावणी गुरुवारी ८ जुलै रोजी लोकशाही पद्धतीने न घेता हुकूमशाही पद्धतीने घेण्यात आली. या जनसुनावणीच्या वेळी लोकशाहीचा अक्षरशः खून करण्यात आला आहे. असे रिवोलूशनरी गोवनचे नेते मनोज परब यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ही जनसुनावणी फक्त नावापुरती घेण्यात आली. नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले नाही. नागरिकांना विश्वासात न घेता चैन्नई येथील आस्थपनेने आराखडा बनविला आहे. गेल्या ७ वर्षात सरकारने काहीच केले नाही.आणि शेवटच्या क्षणी विध्वंसक योजना ते गोमंतकीयांवर थोपवू पाहत आहे. आराखड्यात अनेक ठिकाणची पर्यावरणीय अती संवेदनशील क्षेत्रे व जुनी घरे दाखविण्यात आलेली नाहीत. असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

हा आराखडा स्थानिक लोकांना आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने तयार करणे गरजेचे आहे. या जनसुनावणी वेळी खाजन जमिनी, बांध, मानस, भरती रेषा, भरती रेषे पासून आखण्यात आलेल्या १०० मीटर व २०० मीटरची रेषा, मच्छीमारी क्षेत्र यावर विषय मांडता येतील असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात जनसुनावणी आलेल्या वक्त्या नागरिकांना कोणत्याच प्रकारची योग्य उत्तरे देण्यात आली नाही. गोमंतकीय नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली नाही. वक्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्या ऐवजी पुढील वक्त्यांचे क्रमांक घेतले जात होते. जनसुनावणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना कोकणी भाषा समजत नव्हती. नकाशावरील महत्वाची स्थाने गायब झाली आहेत. ती स्थाने दाखविण्यात आलेली नाही. असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

मडगाव येथे पडद्यावर नकाशे प्रदर्शित केले जात होते,मात्र पणजीला पडद्यावर नकाशे प्रदर्शित करण्यात येत नव्हते. अधिकारी नागरिकांची पर्वा करीत नव्हते.सर्व काही एकतर्फी मनमानी कारभार चालला होता. नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य दिले गेले नाही. शंकांचे निरसन ही कुण्या अधिकाऱ्यांनी केले नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

दुपारी जनसुनावणी साठी पणजीत आलेल्या नागरिकांना जेवायला वेळ देण्यात आला नाही. मात्र मडगाव येथे रिवोलूशनरी गोवनच्या कार्यकर्त्यांनी एक तास आंदोलन केल्यानंतर लोकांना जेवणासाठी वेळ देण्यात आला.पोर्तुगीजांनी पेक्षाही प्रखर हुकूमशाही चे दर्शन जनसुनावणीत च्या वेळी घडले.अजून वेळ गेलेली नाही.अंतिम आराखड्याच्या वेळी गोमंतकीय यांनी अधिक जागृत व संघटित व्हायला पाहिजे. आपल्या गोमंत मातृभूमीच्या रक्षणार्थ आता सर्वांनी सावध होऊन क्रांती करणे गरजेचे आहे. असे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here