वाळपई: राणे पितापुत्रांनी सत्तरीच्या विकास नव्हे विनाश केला आहे.गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष आम्ही साजरे करतो आहोत. परंतु सत्तरीच्या अनेक गावात अजुन मूलभूत साधनसुविधा उपलब्ध नाहीत. रक्तात सत्तरी आहे म्हणणाऱ्या मंत्री विश्वजीत राणेंना मूलभूत साधन सुविधा व विकासापासून वंचित असलेले हे सत्तरीतील गाव दिसत नाहीत काय? .असे रिवोलूशनरी गोवनचे नेते मनोज परब बोलताना म्हणाले.

सत्तरीतील अनेक गावात जावून तेथील समस्या ग्रामस्थांकडून समजून घेतल्यावर ते बोलत होते.

सत्तरीतील नगरगाव पंचायत क्षेत्रातील साटरे गावात साधन सुविधा उपलब्ध नाहीत. या गावात पाणी, वीज, सार्वजनिक बससेवा वाहतूक, दूरध्वनी नेटवर्क व इतर अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या भागातील लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. परंतु या भागातील समस्या जाणून घेण्याचा व त्या सोडविण्याचा प्रयत्न कधीच मंत्री विश्वजीत राणे यांनी केलेला नाही. असे मनोज परब पुढे बोलताना म्हणाले.

सत्तरीतील होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सालेली गावात पाण्याची तीव्र समस्या आहे. पावसाच्या दिवसात सुद्धा ह्या भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. ह्या गावातील लोकांनी पैसे भरूनही त्यांना अद्याप सुलभ शौचालय बांधून देण्यात आलेली नाहीत. ह्या भागाचे आमदार प्रतापसिंह राणे आहेत.ह्या गावाचाही विकास झालेला नाही.असे ते पुढे बोलताना म्हणाले.सत्तरीत हे दोघे पितापुत्र गेली अनेक वर्षे राजकीय सत्ता उपभोगत आहेत. त्यांनी सत्तरीतील लोकांना फक्त गुलाम करून ठेवले आहे. सत्तरी गुलामगिरीतून मुक्त करण्याचा आम्ही निश्चय केला आहे.या भागातील भूमिपुत्र आता जागृत झाले आहेत.येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तरीच्या विकासासाठी व लोकांना सर्व प्रकारच्या मूलभूत साधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ह्या पितापुत्राला घरी बसविण्या वाचून पर्याय राहिलेला नाही.असे मनोज परब शेवटी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here