पणजी: एक प्रशंसनीय आणि उत्तम चाल म्हणून रिवोल्यूषनरी गोवन्सनी या आठवड्यात सुरू केला आहे ‘फॉगींग ड्राइव्ह’ ज्यामुळे डासांचे निवारण अथवा नायनाट करता येईल. रिवोल्यूषनरी गोवन्सचा गट उघड्या जागांवर, नाल्यांमध्ये, मैदानावर आणि निवासी क्षेत्राजवळ फोगिंग करणार आहेत. चिंबल मधील रिवोल्यूषनरी गोवन्सच्या गटाने सांताक्रूझ मतदारसंघात हे काम अगोदरच चालू केले आहे कारण चिंबेलमध्ये डेंगूची प्रकरणे जास्त प्रमाणात आढळली आहेत.

रिवोल्यूषनरी गोवन्सचे मुख्य, श्री. मनोज परब यांनी डेंगूची प्रकरणे हळूहळू वाढत असल्याचा अहवाल ठळकपणे सादर केला आहे.

“डासांच्या जाती जिथे शक्य असेल तिथे डेंगू चा डंक पसरवतात. आम्ही ही ‘फॉगींग ड्राइव्ह’ पूर्ण राज्यामध्ये साकारली आहे ज्यामुळे डासांचा नायनाट करता येईल व डासासंबधीत रोगांवर प्रतिबंध आणता येईल”, मनोज परब यांनी स्पष्ट केले आहे.

रिवोल्यूषनरी गोवन्सचा दृढ विश्वास आहे की, हे काम राज्यात मलेरिया आणि डेंगू ची रुग्ण कमी करायला मदत करेल.

लोक कायम सरकार आणि आरोग्य खात्याबद्दल तक्रार करत असतात की, ते डासांचा धोका कमी करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत म्हणून रिव्होल्युशनरी गोवन्स आणि त्यांच्या गटाने ठरवले आहे की ‘फॉगींग ड्राइव्ह’ संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here