पणजी:
रेव्होलूशनरी गोवन्सने आपल्या “ग्रीन गोवा इनिशीएटीव” या मोहिमे अंतर्गत यंदा २० हजार नवीन रोपट्यांचं लक्ष्य साधून, गोवा हरित बनवण्यासाठी संपूर्ण गोव्यात वृक्षारोपणास प्रारंभ केला. वृक्षारोपणाची सुरूवात समुद्रकिनाऱ्यावरून झाली असून आता ताळगाव, नेरूल, कारापूर, लाटंबार्से, डिचोली, मये, तिवरे, माशेल, सावईवेरे अशा अनेक गावांत हि मोहिम राबवली जात आहे.
गोवा हरित बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संघ नेहमीच तत्पर असतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या मोहिमेत सहभाग घेऊन नापीक जागेवर वृक्षारोपण करतोय, तसेच ग्राममवासियांना मोफत रोपट्यांचे वाटपही चालूच आहे.
ग्रीन गोवा इनिशीएटीव मोहिमेचा महत्वाचा हेतू म्हणजे जंगल वाढीसाठी प्रोत्साहन देणे व लोकांना झाडं लावण्यासाठी व त्यांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करणं असा आहे.कारण वर्तमानात प्रगतीच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड चालू आहे व त्यानंतर पुन्हा नवीन रोपटी लावण्याची कुणी दखल घेत नाही.आता जागे होऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण केले पाहिजे व हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी यंदा २० हजार रोपट्यांची लागवड नक्कीच करू असे विचार या संघाचे अध्यक्ष विरेश बोरकर यांनी या मोहिमेद्वारा मांडले.


श्रीकृष्णा परब म्हणाले की जेव्हा आपण मूलभूत सुविधांच्या विकासाबद्दल बोलतो,तेव्हा सर्वात जास्त हानी ही पर्यावरणाची होते.तमन्नार प्रोजेक्टचा ऊल्लेख करीत ते म्हणाले की यासाठी हजारो झाडे तोडण्यात आली व त्या बदल्यात गोवा सरकार दुसऱ्या राज्यात झाडे लावणार आहे जे की तर्कहिन आहे .पण आम्ही ही वृक्षारोपणाची मोहिम चालूच ठेवणार असल्याचं ते म्हणाले.
प्रियोळ गावातील मोहिमेदरम्यान विश्वेश नाईक व्यक्त झाले की,क्रांतिकारी कै. यतीन वारंग यांच्या स्मृतिर्थ वृक्षारोपण करण्यात आले, कारण या मोहिमेची पायाभरणी याच क्रांतिकाराच्या घरात करण्यात आली होती व या स्मृतिर्थ गावात १ हजार रोपटी लावली.त्यांनी या मोहिमेसाठी धडपडणाऱ्यांचं कौतूक केलं व पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करीत प्रत्येक गोमंतकीयाला विनवणी केली आहे की त्यांनिही ग्रीन गोवा इनिशीएटिवमध्ये सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here